कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
पुणे : प्रतिनिधी
पत्रकारांच्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा आणि पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ कार्यक्रम पुणे येथे २५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केले आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथील जे. डब्ल्यू. मॅरिओट हॉटेलमध्ये रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रम पार पडणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आयुष्मान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि संयोजन समितीचे नंदकुमार सुतार, महेश कुगांवकर, केतन महामुनी, राजू वाघमारे, अमोल पाटील, विकास भोसले, अजिंक्या स्वामी, गणेश हुबे यांच्यासह डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र पदाधिका-यांनी केले आहे.