Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 10, 2025
in राजकीय
0
फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार
0
SHARES
7
VIEWS



नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल मरीन फायटर जेट खरेदी करण्याच्या ६३ हजार कोटींच्या मेगा डीलला कॅबिनेट ऑन सिक्युरिटीने मंजुरी दिली. या करारामुळे नौदलाला ही मरीन राफेल मिळणार आहेत. या नव्या मरीन राफेलने नौदलाची ताकद कैक पटींनी वाढणार आहे.

भारताला प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे. चीनचे समुद्रात प्राबल्य वाढत असताना ही डील झाली आहे. त्यामुळे या कराराप्रमाणे नौदलाला फ्रान्सची अत्याधुनिक २२ सिंगल सिटर आणि ४ ट्वीन सिटर राफेल मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. या लढाऊ विमानांना विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात केले जाणार आहेत. कॅबिनेट मंजुरी दिल्याच्या निर्णयानंतर आता संरक्षण मंत्रालय फ्रान्स सरकारशी कराराला अंतिम स्वरुप आणण्यासाठी अंतिम बोलणी करणार आहे आणि कराराची इतर प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. राफेल मरीन जेटची पहिली डिलिव्हरी २०२९ पर्यंत सुरु होऊ शकते. २०३१ पर्यंत सर्व २६ जेट भारतीय नौदलाना मिळणार आहेत. भारतीय नौदलासाठी राफेल मरीन हे जेट फायटर खास करुन समुद्री गरजांनुसार तयार केले आहे. हे जेट मेटियोर, एक्सोसेट आणि एससीएएलपीसारख्या खतरनाक आणि अ‍ॅडव्हान्स मिसाईल वाहून नेण्यात सक्षम आहे. यामुळे युद्धातील क्षमता खूपच संहारक होणार आहे.

मिग-२९ ची जागा घेणार
हे फायटर मरीन जेट आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतसारख्या विमानवाहू नौकावर तैनात केले जाणार आहेत. ही जेट फायटर जुन्या झालेल्या मिग-२९ या लढावू विमानांची जागा घेणार आहेत. राफेल मरीन जेट लढाऊ विमानांना खास विमानवाहू नौकांवरून उड्डाण घेणे आणि लँडिंग घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात मजबूत लँडिंग गिअर, अरेस्टर हुक्स आणि एसटीओबीएआर तंत्रज्ञान (जे विमान कमी धावपट्टीवरून वेगाने टेक ऑफ आणि लँडिंग घेण्यात मदत करते) या करारामुळे भारतीय नौदलाला जादा ताकद मिळणार आहे.

Previous Post

ट्रम्प टॅरिफ ९० दिवसांसाठी स्थगित

Next Post

एसटी कर्मचा-यांचे अर्धे वेतन रखडले

Next Post
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री सरनाईक

एसटी कर्मचा-यांचे अर्धे वेतन रखडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!
  • बच्चू कडूंचे कर्जमाफीसाठीचे आंदोलन ७ व्या दिवशी मागे

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.