Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

आरसीबीने संपविला आयपीएल चॅम्पियनशीपचा दुष्काळ

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 4, 2025
in क्रिकेट, राष्ट्रीय
0
आरसीबीने संपविला आयपीएल चॅम्पियनशीपचा दुष्काळ
0
SHARES
10
VIEWS

विराटला अश्रू अनावर
अहमदाबाद : वृत्तसंस्था

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शानदार प्रदर्शन करीत पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावत इतिहास रचला. दमदार फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांचा खुबीने वापर केल्याने बंगळुरूला विजय साकारता आला आणि अखेर विराट कोहलीचे स्वप्न साकार झाले. विजय टप्प्यात येताच शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी विराट कोहली स्टेडियमच्या मध्यभागी रडताना दिसला. त्याच्या डोळ््यात आनंदाश्रू होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकल्यानंतर विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्सला मिठी मारली. यानंतर अनुष्काला मिठी मारल्यानंतर विराट रडला.


आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या ४३ धावांच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ९ गडी गमावून १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबला निर्धारित षटकांत ७ गडी गमावून १८४ धावा करता आल्या. यासह आरसीबीने ६ धावांनी सामना जिंकला आणि आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले.


जेतेपद जिंकल्यानंतर आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली भावूक झाला. त्याच्या डोळ््यात विजयाचे अश्रू होते. विजयानंतर कोहलीने प्रथम आपल्या सहका-यांना मिठी मारली आणि विजय साजरा केला. त्यानंतर कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्माला भेटून विजयाबद्दल तिचे अभिनंदन केले. यादरम्यान या महान फलंदाजाने त्याचा माजी संघमित्र आणि खास मित्र एबी डिव्हिलियर्स याचेही अभिनंदन केले.


आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात आरसीबीला जेतेपदाने ३ वेळा हुलकावणी दिली. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला. परंतु प्रत्येक वेळी जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. २०२५ मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाचे नशीब बदलले आणि त्यांनी पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. दुसरीकडे श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या नेतृत्वाखाली ११ वर्षांनी पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या पंजाब किंग्जची जेतेपदाची प्रतीक्षा कायम राहिली.

विराटच्या अश्रूंचा फुटला बांध
आयपीएलच्या १८ व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपद मिळाले. शेवटच्या षटकात पंजाब किंग्सला विजयासाठी २९ धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकण्यासाठी जोश हेझलवूड आला होता. त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यावेळी विराटला विजयाचा विश्वास वाटला. त्यावेळी सीमेवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डोळ््यातून अश्रू आपसूक बाहेर निघाले. गेली १७ वर्षे ज्याची वाट पाहात होता, ते स्वप्न पूर्ण होताना पाहून त्याला अश्रू आवरता आले नाहीत. तो मैदानात अक्षरश: ओक्साबोक्सी रडला.


जिंकल्यावर भावनेने भरून गेलो

हा विजय चाहत्यांसाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो संघासाठी आहे. मी या संघाला माझे तारुण्य, शौर्य आणि अनुभव दिला आहे. प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला. पण हा दिवस येईल, असे कधीच वाटले नव्हते. आता आम्ही जिंकल्यानंतर भावनेने भरून गेलो, असे विराट कोहली म्हणाला.

Previous Post

१५ जूनची निट-पीजी परीक्षा स्थगित

Next Post

राज्यात आता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
जडेजा-वाॅशिंग्टनची सुंदर फलंदाजी
क्रिकेट

जडेजा-वाॅशिंग्टनची सुंदर फलंदाजी

July 27, 2025
Next Post
राज्यात आता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण

राज्यात आता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.