Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा : संभाजीराजे

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 17, 2025
in महाराष्ट्र
0
रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा : संभाजीराजे
0
SHARES
23
VIEWS

मुंबई: रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवले जावे ही माझी आधीपासूनची भूमिका आहे. दंतकथेतून हे पात्र तयार झाले असून ते हटवण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. मुख्यमंत्र्यांकडून याबाबत अपेक्षा आहे. मात्र, आम्ही कुठलीही डेडलाईन ठेवली नसल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या जागेच्या कामाबद्दल बावनकुळे यांची भेट घेतल्याचे त्यांनी म्हटले.

कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला महसूल विभागाकडून 30 एकर जागा मिळणार आहे. असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून या जागेची फाईल मंजूर करावी, अशी विनंती बावनकुळे यांना केली. त्यावर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम साकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजुला तो उभा केला आहे. दंतकथेतून निर्माण झालेले ते पात्र आहे. वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवावे, अशी आपली पहिल्यापासनची भमिका आहे.
तुकोजीराव होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजुला कुत्र्याची समाधी राहणे योग्य नाही.

तुकोजीराव होळकरांचे नाव सोनेरी अक्षराने तिथे लिहायला पाहिजे, याची जबाबदारी मी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने घेतलेली आहे. याबाबत आपली मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली असून त्यांनी लवकरच समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. अमित शहांच्या दौऱ्यामुळे विषय थांबवला होता. वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आज किंवा उद्या वेळ देणार असून तेव्हा त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडला येणार होते. त्यामुळे आपण हा विषय थोडा काळ थांबवला होता. वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याबाबत आमची कुठलीही डेडलाईन नाही, असे स्पष्टीकरण संभाजीराजे छत्रपती यांनी दिले.

Previous Post

कुणाल कामराच्याअटकेला स्थगिती

Next Post

देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी शिकली पाहिजे – मुख्यमंत्री

Next Post
औरंगजेबाची कबर हटविणार नाही

देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी शिकली पाहिजे - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.