इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन नेहमीप्रमाणे पाकिस्तानशी जोडले आहे. यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तर पाकिस्तानकडूनही सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरु झाली होती. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल, अशी जोरदार चर्चा आहे. युद्धाचे हे ढग दाटले असतानाच पाकिस्तानी लष्करात भूकंप झाला आहे. कारण पाकिस्तानी सैन्य दलातील अधिकारी आणि सैनिक मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहेत. एकूण २५० अधिकारी १२०० सैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे.
पाकिस्तानच्या ११ व्या कोअरचे प्रमुख ओमर अहमद बोकारी यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पत्र लिहिले आहे. हे गोपनीय पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, १२ क्वेटा कोअर, फर्स्ट कॉर्प मांगला रिजन, नॉर्दन कमांडमधील अनेक अधिकारी आणि सैनिकांनी राजीनामे दिले आहेत. फर्स्ट कॉर्प मांगला रिजनमध्ये तर ५० अधिकारी आणि ५०० सैनिकांनी लष्करी सेवेतून निवत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सगळ््यांनी वैयक्तिक कारण, कामाचा वाढलेला तणाव आणि भारतासोबत निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीबाबत सरकारकडे नसलेले ठोस धोरण या बाबींचा उल्लेख आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने युद्धाच्या परिस्थितीत कोणत्याही अधिकाºयाने अथवा सैनिकाने राजीनामा देऊ नये, अशी तंबी देऊन ही पडझड तुर्तास थांबवल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी मागणी लष्करप्रमुखांकडे करण्यात आली आहे.त्यातच पाकिस्तानमधील बडे नेते आणि लष्करी अधिकाºयांची कुटुंब देशातून पळ काढत आहेत. अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राजकीय नेते बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबाने पाकिस्तान सोडून परदेशात पळ काढला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पाकविरोधात ४ वेळा युद्ध
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी चार युद्ध झाली. या चारही युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानला पार झोपवले होते. त्यामुळे आता पुन्हा युद्ध झाल्यास भारतीय लष्कराच्या संभाव्य संहाराची भीती अनेकांना वाटत असावी. त्यामुळे लष्करी अधिकाºयांनी राजीनाम्याचे सत्र सुरू केल्याचे समजते.