नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांविरुद्ध एन्काऊंटर सुरू आहे. ही चकमक सुरू असताना सैन्याने दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशनमध्ये प्रथमच ‘रूद्र’ अटॅक हेलिकॉप्टरला उतरवले आहे. शस्त्र सज्जतेसह रुद्र या मिशनमध्ये सहभागी झाला आहे. २० एमएम ऑटोमॅटिक गनने सज्ज असलेला रुद्र दहशतवाद्यांच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. दहशतवाद्यांनी थोडीशी जरी हालचाल केली, तर थेट हल्ल्यासाठी हे हेलिकॉप्टर सज्ज आहे. त्यामुळे अतिरेक्यांना आता छुप्या कारवाया करणे सोपे राहिलेले नाही.
‘रूद्र’ एक साधारण हेलिकॉप्टर नाही तर आकाशातून येणारे ते आगीचे तुफान आहे. हिंदुस्तान एरोनॉटक्िस लिमिटेडने ‘रूद्र’ हेलिकॉप्टर खास अशा मिशनसाठीच बनवले आहे. काही दहशतवादी घनदाट जंगलात लपले आहेत. त्यांच्याकडून फायरिंग सुरु आहे, अशी सैन्याला टीप मिळाली की, लगेचच रुद्र हेलिकॉप्टरच्या मदतीने अतिरेक्यांच्या हालचालींवर आकाशातून नजर ठेवणे आणि त्यांच्यावर आकाशातून हल्ला करण्यासाठी रुद्रची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरेक्यांविरुद्ध जमिनीवर सुरू झालेली ही लढाई आकाशापर्यंत पोहोचली आहे.
अतिरेक्यांविरुद्ध आधी जमिनीवरुन कारवाई केली जायची. तेव्हा दहशतवाद्यांना पकडायला वेळ लागायचा. आता रुद्रच्या तैनातीमुळे ‘नो एस्केप ऑपरेशन’ म्हणजे पळता येणार नाही. कोणी खिडकीतून पळाला किंवा जंगलात लपला तरी रुद्रच्या नजरेतून ते सुटणार नाहीत. रुद्र हेलिकॉप्टर शस्त्रांसह सज्ज असल्याने आता दहशतवादी वाचणार नाहीत. ग्राऊंडवर ऑपरेट करणा-या जवानांना रुद्रकडून रियल टाइम सपोर्ट मिळत आहे. दहशतवाद्यांची हालचाल दिसताच गोळीबार सुरू होईल. त्यामुळे दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत रुद्र गेमचेंजर ठरणार आहे, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.
रुद्र हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये
-२० एमएम टार्गेट गन : एका मिनिटात शेकडो गोळ््या डागता येतात, तेही टार्गेटवर नेम धरून गोळ््या झाडता येतात.
-७० एमएम रॉकेट पॉड्स : दहशतवादी बिळात लपले तरी रॉकेट हल्ल्याने प्रहार करता येतो.
-नाइट विजन आणि थर्मल कॅमरा : अंधारातही या कॅमे-याने दहशतवाद्यांना शोधता येते आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येते.
-मिसाइल डागण्याची क्षमता : हेलिनासारख्या अँटी टँक मिसाइलने बंकरही उद्ध्वस्त करता येतो.