गारमेंटसच्या विविध कामांचा आढावा
गारगोटी प्रतिनिधी
सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार असून शासन स्तरावरून जे सहकार्य लागेल ते आपण देवू, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
खानापूर ता. भुदरगड येथे घेतलेल्या फॅशन डिझाईन कोर्सच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास सौ. अंजली पाटील, सौ. विद्या प्रविणसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री पाटील यांनी गारमेंटच्या विविध कामांचा आढावा घेतला.
ना. पाटील पुढे म्हणाले की, महिला सक्षम झाल्यातरच घराचीही उन्नती होते. त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनविणे आपले कर्तव्य आहे. राज्य वाहतूक आघाडी उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत म्हणाले की, चंद्रकांतदादानी महिलांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असुन जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
यावेळी ना. पाटील यांचे स्वागत पार्थ सावंत यांनी केले तर कार्यक्रमास चंद्रकांतदादा पाटील,अंजली पाटील, प्रवीणसिंह सावंत,विद्या सावंत,वृंदा घाडगे, पार्थ सावंत,दत्ता चव्हाण, दत्ता पाटील,सुशांत मगदूम,स्वप्निल मांगले,सुभाष सुतार,युवा पाटील,संजय रेडकर,सागर नाईक,कृष्णात गोरे, रमेश माने, सुरेश पाटील उपस्थित होते.
गारगोटी… खानापूर येथे सरस्वती गारमेंटसच्या भेटीप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रविण सिंह सावंत, पार्थ सावंत व मान्यवर उपस्थित होते. सरस्वती गारमेंट खानापूर व प्रथम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.