Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

यूपीएससीत शक्ती दुबे देशात पहिली

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 23, 2025
in राष्ट्रीय
0
यूपीएससीत शक्ती दुबे देशात पहिली
0
SHARES
21
VIEWS

हर्षिता गोयल दुसरी तर पुण्याचा अर्चित डोंगरे राज्यात पहिला, देशात तिसरा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या यूपीएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला तर हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून पुण्याच्या अर्चित डोंगरेने देशात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला आला आहे. यंदाही यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाण्यासह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.


यूपीएससी परीक्षा २०२४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यूपीएससी डॉट जीओव्ही डॉट ईन या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे या उमेदवाराने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण १००९ उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये ३३५ सर्वसाधारण, १०९ ईडब्ल्यएस, ३१८ ओबीसी, १६० एससी, ८७ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या १७ एप्रिल २०२५ पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ७ जानेवारी २०२५ पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती. २०२४ च्या परीक्षेत यूपीएससीने आयएएस, आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती काढली होती.


देशात पहिली आलेल्या शक्ती दुबेने अलाहाबाद विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी (विज्ञान पदवी) पूर्ण केली. तिने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा पर्यायी विषय निवडला अणि त्यात पात्रता मिळविली. २०१८ पासून तिचे प्रयत्न सुरू होते. सात वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तिला यश मिळाले. देशात दुसरी आलेल्या हरियाणाच्या हर्षिता गोयलने बडोद्याच्या एमएस विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. तिने यूपीएससी मुख्य परीक्षेत राजकीय शास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय पर्यायी विषय म्हणून घेतले होते. हर्षित सीए आहे तर देशात तिसरा आलेला मराठमोळा अर्चित डोंगरे वेल्लोरमधील व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) पदवी घेतली. त्याचा तत्वज्ञान हा परीक्षेसाठी पर्यायी विषय होता.


यूपीएससीत मराठी झेंडा
यूपीएससी परीक्षेत यंदाही मराठी झेंडा फडकला असून पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आणि राज्यात पहिला आला. ठाण्यातील तेजस्वी देशपांडेने ९९ वी रँकिंग, ठाण्याच्या अंकिता पाटीलने ३०३ वा रँक मिळवला. जालन्यातील आकाश गोरेने यश मिळविले. यवतमाळ जिल्ह्यातील अदिबा अनम अश्फाक अहमदने १४२ वी रँक प्राप्त करीत महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम आयएएस बनली आहे. नांदेड जिल्ह्यातून शिवराज गंगावळ, शुभांकर हिब्बारे, अतुल राजूरकर, आनंद सदावर्ते या चौघांनी तर लातूर जिल्ह्यातून रेणापूर तालुक्यातील पानगावची कन्या संपदा धर्मराज वांगेने ८३९ वा रँक आणि जळकोट तालुक्यातील चाटेवाडीच्या सुशील सूर्यकांत गिते याने ६२३ वी रँक मिळविली.

आयटी कंपनीतील नोकरी
सोडून यूपीएससीची तयारी

अर्चित डोंगरे हा मूळचा पुण्याचा असून त्याने शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षणसाठी पुणे गाठले. इंजिनिअरींगच्या पदवीनंतर १ वर्षे आयटी कंपनीत काम केले. त्यानंतर नोकरी सोडून त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे २०२३ च्या यूपीएससी परीक्षेत त्याने १५३ वी रँक मिळवली होती. त्यामुळे आयपीएससाठी त्याची निवड झाली होती. तो सध्या त्याचे आयपीएस प्रशिक्षण सुरू आहे. परंतु त्यानंतरही त्याने तयारी करीत आता देशात तिसरा येण्याचा मान मिळविला.

Previous Post

झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी

Next Post

हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर मागे

Next Post
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर मागे

हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?
  • कृषी क्षेत्रात आता एआय वापर
  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.