श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना ठार केल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत .गेल्या २४ तासांत काश्मीर खोºयात सक्रिय दहशतवाद्यांची आणखी चार घरे उडवून दिल्यानंतर काश्मीर खोºयात आता आणखी एक हत्याकांड झाले आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काही अज्ञातांनी घरात घुसत एका नागरिकाची गोळ््या झाडून हत्या केली आहे. मारला गेलेला व्यक्ती एक सामान्य नागरिक होता. या व्यक्तीचा भाऊ काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेला होता. तो लष्करात सामील असल्याची माहितीही समोर येत आहे.
संशयित बंदूकधाºयांनी शनिवारी रात्री उशिरा ४५ वर्षीय गुलाम रसूल मगरे याची गोळ््या घालून हत्या केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तात्काळ त्याला उपचारासाठी श्रीनगरच्या एका रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी तिथेच त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन नंतर करण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.