दर घसरले, शेतकºयांना मोठा आर्थिक फटका
मुंबई : प्रतिनिधी
देशात सर्वाधिक प्रमाणात कांदा उत्पादन करणाºया महाराष्ट्रातील शेतकºयांना सध्या प्रचंड आर्थिक फटका बसत असून, त्याचे मुख्य कारण कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत निर्यात धोरणातील त्रुटींवर जोरदार टीका केली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याच्या निर्यातीत मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या देशातून फक्त ७ ते ८ टक्के कांद्याची निर्यात होत असून, यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचा साठा वाढत आहे आणि परिणामी दर कोसळत आहेत. या घसरणीचा मोठा आर्थिक फटका थेट शेतकºयांना बसत आहे, असे कांदा उत्पादक संघटनेचे म्हणणं आहे.
कांदा उत्पादक संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांनी याबाबत म्हटले आहे की, देशातून वीस ते पंचवीस टक्के कांदा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलावे. निर्यात शुल्क लावल्याने कांद्याच्या दरात होणारी पडझड यावर वाणिज्य मंत्रालयाकडून शेतकºयांच्या कांद्याला भाव मिळावा, यासाठी विशिष्ट धोरण तयार करावे. सध्या सात ते आठ टक्के कांदा निर्यात होत असताना वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कांदा परदेशात निर्यात कसा होईल? यासाठी केंद्राने तात्काळ निर्णय घ्यावे, अशी मागणी केली आहे.