भारतातील कटात होता सहभाग, अज्ञातांनी गोळ््या घालून मारले
इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तान भारताविरोधात अतिरेकी कारवाया घडवून आणण्यासाठी अतिरेक्यांना आश्रय देत आहे. परंतु या अतिरेकी संघटनांमध्ये फारसे सख्य नसल्याचे आता समोर येत आहे. कारण लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर असलेल्या अबू सैफुल्लाह याची रविवार, दि. १७ मे रोजी घराबाहेर पडताच गोळ््या घालून हत्या करण्यात आली. अज्ञातांनी गोळ््या झाडून त्याला ठार केले. परंतु यामागे अतिरेकी संघटनांमधील संघर्ष असल्याचे बोलले जात आहे.
लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयावर २००६ मध्ये बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट रचला होता. त्याच्या हत्येने पाकिस्तानात दहशतवाद्यांचे चांगलेच धाबे दणाणले.अबू सैफुल्लाह याची पाकिस्तानात त्याच्या राहत्या घराच्या बाहेर हत्या करण्यात आली. सैफुल्लाह हा पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मतली शहरात राहायचा. तो घरातून बाहेर पडल्यानंतर मतली फलकारा चौकात त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. अबू सैफुल्लाह हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर होता. त्याचे पूर्ण नाव मोहम्मद सलीम उर्फ राजूल्लाह निजामनी असे होते. सैफुल्लाह पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून त्याचे काम करीत होता. तो लष्कर-ए-तोयबासाठी नव्या दहशतवाद्यांची भरती जोमाने करत होता. तो नेपाळमध्ये विनोद कुमार या खोट्या नावासह राहात होता. त्याने खोट्या नावानेच नेपाळमधील एका महिलेशी लग्नही केले. नगमा बानू या महिलेचे नाव आहे.
भारतात हल्ल्याचा
रचला होता कट
अबू सैफुल्लाह याने नागपूरसह बंगळुरूत बॉम्ब हल्ल्याचा कट रचला होता. तसेच काश्मीरमध्येदेखील त्याने दहशतवादी कारवाया केल्या होत्या. सैफुल्लाह २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यात मुख्य आरोपी होता. तसेच आयआयएससी बंगळुरु येथे २००५ मधील हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.
नेपाळमधून चालवायचा नेटवर्क
सैफुल्लाह नेपाळमधील लष्कर-ए-तोयबाचे पूर्ण मॉड्यूल चालवत होता. तो लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कारवायांसाठी अर्थसहाय्य द्यायचा. तो नेपाळमधून भारतात दहशतवादी कट रचायचा. त्याने नेपाळमध्ये दहशतवाद्यांचे मोठे नेटवर्क तयार केले होते.