गवर्षीची विश्वसुंदरी क्रिस्टिना पिस्झकोवाने चढविला विजेतेपदाचा मुकूट
हैदराबाद : वृत्तसंस्था
हैदराबाद येथे दि. ३१ मे २०२५ रोजी झालेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत थायलंडच्या ओपन सुचाता चुआंगस्री हिने बाजी मारली. गेल्या वर्षीची विश्वसुंदरी क्रिस्टिना पिस्झकोवा हिने ओपल सुचाला हिच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट चढवला. इथिओपियाची हॅसेट डेरेजे अदमासू हिने दुसरा, तर पोलंडची मेय क्लाजदा हिने तिसरा क्रमांक मिळवला.
अभिनेता सोनू सूद, उद्योगपती सुधा रेड्डी, माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर, अभिनेता राणा डग्गुबती यांचा परीक्षकांमध्ये समावेश होता. ओपल सुचाता ही थायलंडच्या फुकेतमध्ये लहानाची मोठी झाली. ती आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी घेत असून ती मॉडेलसुद्धा आहे. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी तिने बरेच सामाजिक कार्य केले. वयाच्या १६ व्या वर्षी ओपल सुचाताला तिच्या ब्रेस्टमध्ये एक गाठ आढळली होती. ही गाठ सौम्य प्रकारची असली तरी थायलंडमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल आणि त्याच्या लवकर निदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यास तिला प्रेरणा मिळाली.
ओपल सुचाताने याआधी मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मिस युनिव्हर्स २०२४ स्पर्धेत थायलंडचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत ती तिसरी उपविजेती ठरली होती. परंतु ‘मिस युनिव्हर्स थायलंड’ची तिसरी उपविजेती म्हणून १२ महिने पूर्ण करण्याआधीच तिने ‘मिस वर्ल्ड थायलंड २०२५’चा किताब जिंकल्याने तिचा उपविजेतीचा किताब मागे घेण्यात आला.