Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

पाकिस्तानच्या चिंधड्या

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 9, 2025
in आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय
0
पाकिस्तानच्या चिंधड्या
0
SHARES
12
VIEWS


रात्रभर क्षेपणास्त्र हल्ले, शुक्रवारीही पाकचे ड्रोन हल्ले, भारताचे जोरदार प्रत्युत्तर
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने गुरुवार (दि. ८) रात्रभर पाकिस्तानला मोठा दणका दिला. भारताने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार उडाला. कानठळ््या बसवणाºया स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली…पाकिस्तानातील १६ शहरांवर भारताने जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला…अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली. दरम्यान, शुक्रवारी सकाळीही पाकिस्तानने चंदीगडमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानावर ड्रोन हल्ला केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारी रात्रीपासून युद्धाला तोंड फुटले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तान आणि भारताने एकमेकांवर हवाई हल्ले केले होते. यामध्ये भारताने पाकिस्तानचे हवाई हल्ले परतावून लावले होते. परंतु भारतीय वायूदलाच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, क्वेटा या प्रमुख शहरांमध्ये मोठे नुकसान झाले होते. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेनेही कराची बंदरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर दुसºया दिवशीही शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरु असल्याचे दिसत आहे.

भारतीय वायदूलाने शुक्रवारी सकाळीही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या ओकारा आर्मी कैंट परिसरात ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. कालच भारताने पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने सीमारेषेवर हल्ले करत आहे. शुक्रवारी सकाळीच पाकिस्तानचे ५ ड्रोन्स चंदीगढ शहरात शिरले होते. त्यामुळे सायरन वाजवून शहरातील सर्व लोकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर आता भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

पाकचे ५० ड्रोन्स पाडले
पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमारेषेवर असलेल्या १५ शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. नियंत्रण रेषेलगत विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळांवर आणि शहरांवर स्वार्म ड्रोन्सने हल्ले केले. भारताने पाकिस्तानचे जवळपास ५० ड्रोन्स पाडले. पाकिस्ताने भारताच्या उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा, राजौरी आणि पठाणकोट या भागात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला होता. तसेच पाकिस्तानची अनेक ड्रोन्सही भारतावर हल्ला चढवण्यासाठी आली होते. मात्र, भारताच्या एस-४०० या डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने पाडली. याशिवाय, एल 70 गन, झेडयू-२३ एमएम आणि शिल्का यंत्रणेनेही पाकिस्तानचे रॉकेट हल्ले परतावून लावले.

ताजमहाल, लाल किल्ला,
इंडिया गेट सुरक्षा वाढवली

भारत पाकिस्तान यांच्यामधील युद्धजन्य पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ताजमहाल, लाल किल्ला, इंडिया गेटवर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दिल्ली पोलिसांच्या गाड्यांची गस्त, असामाजिक तत्व, अनोळखी वस्तू दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. भारताची आर्थिक राजधानीसह महाराष्ट्रातही अलर्ट जारी केला असून, सार्वजनिक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Previous Post

पाक लष्करप्रमुख असीम मुनीरला अटक

Next Post

बलोच आर्मीचा पाकच्या एक तृतीयांश भागावर कब्जा !

Next Post
बलोच आर्मीचा पाकच्या एक तृतीयांश भागावर कब्जा !

बलोच आर्मीचा पाकच्या एक तृतीयांश भागावर कब्जा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.