मुंबई : जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईसह देशभरात चोख सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.
मुंबईत सुरक्षा यंत्रणेला अतिसतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला असून संशयित हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
कोकण किनारपट्टीवर खबरदारी म्हणून चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यांत चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.