यूपीआय सर्व्हर डाऊन, डिजिटल पेमेंटला मर्यादा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात यूपीआय सर्व्हर पुन्हा एकदा डाऊन झाले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून डिजिटल पेमेंट करताना लोकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. यूपीआयमध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो युजर्स डिजिटल पेमेंट करु शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर युजर्सची गैरसोय होत आहे. अचानक झालेल्या या बिघाडामुळे फोन पे, गुगल पे आणि पेटीएमद्वारे देण्या-घेण्याचे व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे नागरिक हैराण झाले अआहेत. यासंदर्भात दुपारपर्यंत जवळपास १,१६८ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यात गुगल पेवर 96 आणि पेटीएमवर २३ यूजर्सनी अडचणी येत असल्याची माहिती दिली.
यूपीआय सेवा ठप्प पडल्यामुळे, वापरकर्त्यांना पेमेंट करण्यात अनेक अडचणी येत होत्या. किराणा खरेदी असो किंवा मॉलमध्ये बिल भरणे असो, सर्वत्र व्यवहार अडकले आहेत. अनेक लोक कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकले नाहीत. या समस्येबद्दल वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर खूप तक्रारी केल्या आहेत.
वढक सेवा ठप्प पडल्यामुळे, वापरकर्त्यांना पेमेंट करण्यात अनेक अडचणी येत आहेत. आज (शनिवारी, १२ एप्रिल) देशभरात अचानक यूपीआय सिस्टम क्रॅश झाली, ज्यामुळे वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या प्रमुख अॅप्सवर व्यवहार अयशस्वी झाल्याच्या तक्रारी सतत येऊ लागल्या.
किराणा दुकाने, मॉल आणि रेस्टॉरंट्समध्ये लोक बिल भरू शकत नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांची गैरसोय झाली आहे. वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आणि तक्रारी पोस्ट केल्या. दुपारी १२ वाजेपर्यंत, १,२०० हून अधिक लोकांनी डाउनडिटेक्टर वेबसाइटवर यूपीआय सेवेत व्यत्यय आल्याची तक्रार केली. यापैकी, ६६% वापरकर्त्यांनी पेमेंट अयशस्वी झाल्याची तक्रार केली, तर ३४% वापरकर्त्यांनी ट्रान्सफरमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार केली. ही समस्या कोणत्याही एका बँकेपुरती किंवा अपपपुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण यूपीआय नेटवर्कवर परिणाम झाला होता. सध्या, एनपीसीआयकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
२० दिवसांत तिस-यांदा गैरसोय
गेल्या २० दिवसांत तिसऱ्यांदा ही युजर्सची गैरसोय होत आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये अलीकडे अनेक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे भारतातील वापरकर्त्यांना गैरसोय होत आहे. गेल्या 20 दिवसांत तिसऱ्यांदा ही समस्या उद्भवली.