पाटणा वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आयपीएलमधील गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावून वैभवने इतिहास रचला. डावखु-या फलंदाजाने सवाई मानसिंग स्टेडियम स्वत:: साठी संस्मरणीय बनवले. त्यामुळे त्याला हे बक्षीस जाहीर केले. वैभव बिहारमधील ताजपूरच्या मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी स्कूलमध्ये नववीच्या वर्गात आहे. तो वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळतो. त्याने आयपीएलमध्ये इतिहास घडविला.
आयपीएलमध्ये कमी वयात
पदार्पण करणारे खेळाडू
१) वैभव सूर्यवंशी, राजस्थान (१४ वर्षे, २३ दिवस) -२०२५, प्रयास रे बर्मन, आरसीबी ( १६ वर्षे, १५७ दिवस)-२०१९, मुजीब उर रहमान (१७ वर्षे, ११ दिवस)-पंजाब, रियान पराग, राजस्थान रॉयल्स (१७ वर्षे,१५२ दिवस)-२०१९