Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

इस्रायल-इराणमध्ये युद्धाचा भडका!

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 14, 2025
in आंतरराष्ट्रीय
0
इस्रायल-इराणमध्ये युद्धाचा भडका!
0
SHARES
19
VIEWS


इस्रायलच्या एअर स्ट्राईकने इराणचे प्रत्युत्तर, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्राचा मारा
जेरूसलेम : वृत्तसंस्था
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही देशांच्या क्षेपणास्त्रांच्या पावसामुळे जग चिंतेत पडले आहे. शुक्रवारी पहाटेपासून क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाला असून, यामुळे युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमधील सहा शहरांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढविला. पहाटे एअर स्ट्राईक घडवल्याने इराण हादरले. त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. आधीच गाझा, लेबनॉन, सीरिया आणि येमेनमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यात इस्रायल-इराण यांच्यात संघर्ष पेटल्याने संघर्षाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


इस्रायलने शुक्रवारी दिवसभरात इराणवर तिस-यांदा हल्ला चढवला. पहाटे शेकडो लढाऊ विमाने इराणमध्ये घुसली आणि तेथील अण्वस्त्र कार्यक्रमावर हल्ले चढविले. इराणची राजधानी तेहरानसह सहा शहरांत एअर स्ट्राईक घडवून आणला. यात इराणचे महत्त्वाचे अण्वस्त्र शास्त्रज्ञ ठार झाले. तसेच अण्वस्त्र कार्यक्रमाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता इराणने इस्रायलवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. आता युद्ध भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देश सोडल्याचे वृत्त आहे. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमध्ये २०० पेक्षा जास्त लढाऊ विमाने घुसविली होती.


इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने शनिवारी इस्रायलमधील तेल अवीव आणि जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांमध्ये हवाई हल्ला केला. त्यामुळे शनिवारी पहाटे सायरन वाजायला सुरुवात झाली. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, इराणची क्षेपणास्त्रे हवाई संरक्षणाद्वारे रोखली जात आहेत. इराणकडून मोठ्या प्रमाणात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यातील बहुतांश थांबविण्यात आल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. मात्र, सर्व क्षेपणास्त्रे थांबू शकली नाहीत आणि काही तेल अवीवमध्ये पडली. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या इस्रायलने दिलेली नाही. तेल अवीवमध्ये काही ठिकाणी बचाव पथके सक्रिय असल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, इराणने इस्रायलच्या नागरी लोकसंख्येच्या केंद्रांवर क्षेपणास्त्रे डागून लाल रेषा ओलांडली आहे. इस्रायल त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असे ते म्हणाले.

. इस्रायलकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाठवण्याची चर्चा आहे. तेहरानच्या विमानतळावर स्फोटाचा आवाज ऐकू आला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या घराजवळ आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या घराजवळ शनिवारी सकाळी आकाशात खळबळ उडाली आहे. इराणच्या एअर डिफेन्सने इस्रायलचे ड्रोन पाडले आहे. तत्पूर्वी इराणने शुक्रवारी रात्री दोन हवाई हल्ले केल्यानंतर शनिवारी हवाई हल्ल्याची तिसरी लाट आणली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर युद्ध सुरू केल्याचा आरोप केला.

शुक्रवारी इस्रायलकडून इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला. इराणच्या लष्करी आस्थापना, अणुकेंद्रे, कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. इराणवरील इस्रायलचे हल्ले आणि इराणला प्रत्युत्तर यामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे. गाझा, लेबनॉन, सीरिया आणि येमेनमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत परिसरात प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

इस्रायली कंपन्यांनी
विमानेही हलविली

इस्रायली विमान कंपन्यांनी आपली विमाने एकही प्रवासी न घेता परदेशात हरवली आहेत. एलएल इस्रायल आणि अर्कियाने आपली विमाने इस्रायलबाहेर नेऊन पार्क केली आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत.

इराणने केली हवाई क्षेत्र बंदी
भारताला पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंदी घातल्याने गुजरातमधून समुद्राला वळसा घालून इराणच्या हवाई क्षेत्रातून युरोपीयन देश, अमेरिका आणि इतर देशात जावे लागत होते. आता इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने हवाई क्षेत्र बंदी घातल्याने भारताला पुन्हा विदेशात मोठा वळसा घालून जावे लागणार आहे.

Previous Post

सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करणार : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Next Post

बच्चू कडूंचे कर्जमाफीसाठीचे आंदोलन ७ व्या दिवशी मागे

Next Post
बच्चू कडूंचे कर्जमाफीसाठीचे आंदोलन ७ व्या दिवशी मागे

बच्चू कडूंचे कर्जमाफीसाठीचे आंदोलन ७ व्या दिवशी मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!
  • बच्चू कडूंचे कर्जमाफीसाठीचे आंदोलन ७ व्या दिवशी मागे

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.