Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

वक्फ विधेयकाला लोकसभेत मंजुरी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 3, 2025
in state
0
0
SHARES
2
VIEWS


वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा, विधेयकाच्या बाजूने २८८ मते
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल बुधवारी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. यामध्ये सत्ताधारी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकाचे जोरदार समर्थन केले. त्यानंतर मध्यरात्री वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ मते पडली. या मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.

केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर यावर चर्चा सुरू झाली. कॉंग्रेस, सपासह विरोधी पक्षातील सदस्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. खा. असदुद्दीन ओवेसी यांनी तर या विधेयकाला विरोध करीत विधेयकाची प्रत फाडून ते निघून गेले. तसेच वक्फवर दोन बिगर मुस्लिम सदस्य असतील, तर हिंदू देवतांच्या ट्रस्टवर मुस्लिम का नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

यावेळी अमित शाह यांनी मी या विधेयकाला समर्थन देण्यासाठी उभा आहे. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी ऐकत आहे. काही सदस्यांच्या मनात गैरसमज आहेत. काही जण राजकीय फायद्यासाठी समाजात चुकीची माहिती पसरवत आहेत. हा कायदा मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कामात आणि त्यांनी दान केलेल्या संपत्तीत हस्तक्षेप करतो, असा गैरसमज पसरवला जात आहे. अल्पसंख्याकांना घाबरवून मतांची बँक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वक्फमध्ये कोणत्याही गैर-मुस्लिमाची नेमणूक होणार नाही. धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनासाठी गैर-मुस्लिमांना नियुक्त करण्याचा कोणताही विचार नाही, असे म्हटले.
वक्फ हा अरबी शब्द आहे. वक्फचा इतिहास काही हदीसांशी (इस्लामी धर्मग्रंथ) जोडलेला आहे.

आजकाल वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावाने संपत्ती दान करणे. धार्मिक कार्यांसाठी संपत्ती दान करणे म्हणजे वक्फ. इस्लामचे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात वक्फ अस्तित्वात आला. आजच्या भाषेत वक्फ म्हणजे धर्मादाय नोंदणी. यात व्यक्ती आपली संपत्ती, जमीन धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी दान करते. ती परत घेण्याचा कोणताही उद्देश नसतो. दान करणारा खूप महत्त्वाचा असतो. दान त्याच गोष्टीचे करता येते जी आपली आहे. मी सरकारी संपत्ती दान करू शकत नाही किंवा दुस-या कोणाच्या मालकीची संपत्ती दान करू शकत नाही, असे शाह म्हणाले.

कायद्याद्वारे धार्मिक
कामात हस्तक्षेप नाही
वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डची स्थापना १९९५ मध्ये झाली. हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक कामात हस्तक्षेप करतो, हे चुकीचे आहे. काही लोक अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत आहेत आणि मतांसाठी खोट्या बातम्या पसरवत आहेत.

Previous Post

आयुष्मान भारत, मिशन महाराष्ट्र समितीचे पुनर्गठन

Next Post

अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर

Related Posts

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
state

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

July 22, 2025
सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट
state

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 19, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?
state

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

July 11, 2025
३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग
state

३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग

July 1, 2025
state

७६ लाख वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

June 26, 2025
११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
state

१८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

June 17, 2025
Next Post

अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.