Saturday, July 12, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

वक्फ विधेयकावर राज्यसभेतही मोहोर

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 4, 2025
in state
0
0
SHARES
1
VIEWS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली. गुरुवार, दि. ३ एप्रिल रोजी १२ तासांच्या चर्चेनंतर रात्री २.३० वाजता विधेयकावर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळाले. या अगोदर लोकसभेत बुधवारी (२ एप्रिल) मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेत देखील गुरुवारी (३ एप्रिल) मध्यरात्री २.३० वाजता वक्फ सुधारणा विधेयक १२८ विरुद्ध ९५ मतांनी मंजूर झाले.

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत १२ तासांपेक्षा जास्त चर्चा झाली. या मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर वक्फ विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर या विधेयकाच्या विरोधात ९५ मते पडली. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

दरम्यान, मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नाही. फक्त वक्फ मालमत्तांचे नियमन आणि व्यवस्थापन सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले आहे. याला कॉंग्रेससह विरोधकांनी कडाडून विरोध केला. परंतु अखेर हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. आता हे विधेयक आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले जाईल. त्यांनी अधिसूचना जारी केल्यानंतर हा कायदा लागू होईल, असे मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडताना किरेन रिजिजू यांनी इंडिया आघाडी मुस्लिमांची दिशाभूल करत असून हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही, ते गरीब मुस्लिमांच्या विकासासाठी आणले गेल्याचा दावा केला. आत्ता वक्फच्या ८.७२ लाख मालमत्ता आहेत. २००६ मध्ये सच्चर समितीच्या आकडेवारीनुसार वक्फच्या ४.९ लाख मालमत्ता होत्या. त्यातून १२ हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. आता तर वक्फची संपत्ती वाढली आहे. त्यातून किती उत्पन्न मिळू शकते याचा विचार करा. या उत्पन्नातून गरीब मुस्लिमांचे कल्याण करता येऊ शकते, असा ते म्हणाले.

Previous Post

अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर

Next Post

राज्यसभेतही वक्फ विधेयक मंजूर

Related Posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?
state

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

July 11, 2025
३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग
state

३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग

July 1, 2025
state

७६ लाख वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

June 26, 2025
११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
state

१८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

June 17, 2025
२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना
state

जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून

June 17, 2025
बार्शीच्या डॉ. हिरेमठ हाॅस्पीटलचा रविवारी नूतनीकरण शुभारंभ
state

बार्शीच्या डॉ. हिरेमठ हाॅस्पीटलचा रविवारी नूतनीकरण शुभारंभ

June 13, 2025
Next Post
वक्फ विधेयकाला लोकसभेत मंजुरी

राज्यसभेतही वक्फ विधेयक मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे?

शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे?

July 12, 2025
राफेल विमानावर नवीन प्रणाली बसवणार

राफेल विमानावर नवीन प्रणाली बसवणार

July 12, 2025
जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

जनसुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही मंजूर

July 11, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.